Thursday, May 15, 2008

उपवास: शरीर जाणण्याचा मार्ग

- अमर मिश्रा

चांगला आहार आणि पुरेसा व्यायाम हे आरोग्यपूर्ण जीवनाचे दोन खांब आहेत, आणि यात तुमच्या मनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आहारावर नियंत्रण ठेवण्यामध्ये मनावरील नियंत्रणाचा सहभाग मोलाचा असल्यामुळेच अनेक धर्मांमध्ये उपवासाला स्वयंशिस्तीच्या दृष्टीने बघितलेलं आहे.

तुमच्या शरीराचा स्वत:चा असा एक प्रोग्राम असतो, तो तुम्ही जाणून घेतलात तर आरोग्य आणि आनंद या दिशेने तुमची वाटचाल शक्य होईल. तुमच्या शरीरासाठी अयोग्य असलेले अन्नपदार्थ खाण्याची लालसा आटोक्यात येईल, त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत. या पद्धतीला 'साक्षी' राहणं म्हणतात. याची सुरुवात रोज सकाळी फक्त पाच मिनिटं स्वत:च्या शरीरासाठी दिलीत तरी होऊ शकते. सकाळी पाच मिनिटं केवळ श्वासावर लक्ष केंदीत करायचं. तुम्हाला जी स्थिती आरामदायी वाटते, त्या स्थितीत बसा आणि श्वास घेताना, तो सोडताना त्या क्रियेकडे नीट बघा. श्वासावर लक्ष केंदीत करण्याचा तुम्हाला सराव झाला की, विचाररहित मनाची अवस्था क्षणभर का होईना तुम्ही अनुभवू शकाल. काही काळाने तुम्ही मनामध्ये सतत सुरू असणाऱ्या विचारांकडे बघू शकाल, एका विषयाकडून दुसऱ्या विषयाकडे मन कसा प्रवास करत राहतं हे ही तुमच्या लक्षात येईल. तुमच्या इंदियांवर आणि अर्थातच तुमच्या मनावर कुणाचं राज्य चालतं हे तुम्हाला कळून चुकेल.

तुमच्याकडे इंदियरुपी पाच नोकर आहेत. त्यांच्या सहाय्याने तुम्ही बघू शकता, ऐकू शकता, वास घेऊ शकता, चव घेऊ शकता आणि स्पर्श करू शकता. यापैकी कुठलेही इंदिय तुमच्या भुकेवर अंमल गाजवत नाही. तरीही आवडते खाद्य पदार्थ बघितल्यावर भुकेची भावना होते. आवडत्या खाद्यपदार्थाची चर्चा जरी झाली, किंवा त्याचा गंध आला तरीही भूक चाळवली जाते. एखाद्या पदार्थाची चव आवडली की तो पदार्थ आणखी...आणखी... खावा असं वाटतं. पण ज्याप्रमाणे नोकरांच्या हातात तिजोरीच्या चाव्या दिल्यात, तर फार काळ श्रीमंतीचा आनंद उपभोगू नाही शकणार, त्याप्रमाणेच इंदियांच्यावर तुम्ही भूक सोपवलीत तर आरोग्याचा आनंद गमवाल.

भुकेची जाणीव निर्माण झाली की, मेंदुकडे विशिष्ट संदेश पाठवण्याचा विशिष्ट प्रोग्राम तुमच्या शरीरात केलेला आहे. परंतु वास्तवात होतं काय की, आपल्या खाण्यापिण्यावर बहुतेकवेळा आपल्या शरीराच्या गरजेपेक्षा आपल्या सवयींचं नियंत्रण असतं. मग प्रश्न असा निर्माण होतो की, खरी भूक कशी ओळखायची?

तुमची भूक जाणण्याची उपवास ही वेळोवळी सिद्ध झालेली गोष्ट आहे. जगातल्या बहुतेक सर्व धर्मांनी या उपलब्धीचा वापर केला आहे. याची सुरुवात करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुम्हाला किती झेपतंय याचा अंदाज घेऊन फक्त 'पाणी' असा आहार घ्यायचा. कुठलीही वैद्यकीय अडचण नसेल तर १० तासांपासून २४ तासांपर्यंत केवळ पाण्यावर रहायचं. भूकेवर आणि भूकेची तीव्रता कशी वाढत जाते यावर लक्ष केंदीत करणं हे या प्रयोगामागचं मुख्य कारण आहे. ज्यावेळी तुमचं शरीर सांगेल की भूक लागलीय आणि अन्नाची गरज आहे, त्यावेळी त्या जाणिवेकडे, त्या अनुभवाकडे साक्षीभावानं बघण्याचा प्रयत्न करा. पाणी प्या, मग भूकेचा इशारा विरून जाईल. काही काळाने जास्त तीव्रतेनं भूक लागल्याचा इशारा पुन्हा मिळेल. या इशाऱ्याकडेही नीट बघा, त्याच्याकडे लक्ष केंदीत करा, साक्षीभावानं बघण्याचा प्रयत्न करा.

ज्यावेळी खूपच भूक लागेल, त्यावेळी एखाद्या फळाचं ज्यूस प्या त्यामुळे तृप्तता अनुभवाल. या समाधानाच्या, तृप्ततेच्या भावनेचा इशारा कसा निर्माण होतोय हे बघा. फळं, दूध आदी आहार घ्या, परंतु प्रत्येकवेळी भुकेबरोबरच शरीराला मिळत असलेल्या समाधानावर, तृप्तीवर लक्ष राहू द्या. आपल्या शरीराचं कार्य कसं चालतं, हे समजणं हा या प्रयोगाचा उद्देश आहे.

पृथ्वीवर सहा अब्ज लोक राहतात, आणि विशेष म्हणजे कुठल्याही दोन व्यक्तींचे हाताचे ठसे सारखे नसतात. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते, तिची स्वत:ची अशी वैशिष्ट्ये असतात. म्हणून तुम्ही तुमच्या शरीराचा मान राखा आणि तिच्या जडणघडणीची, कार्याची माहिती करून घ्या. त्यासाठी उपवास हा सिद्ध झालेला प्रकार आहे. याद्वारे स्वत:विषयी ज्ञान मिळवलंत तर तुमचं शरीर नेहमीच आरोग्यपूर्ण राहील...

सुखानं मरण्यासाठी!


तुम्हालाही मरण टळलेलं नाही, याची तुम्ही रोज स्वत:ला आठवण करून दिलीत तर वरच्या जाणिवेच्या दिशेने तुमचा प्रवास सुरू होईल. जीवनाचं अशाश्वत, र्मत्य रूप तुम्ही निरखलंत तर कुणावर राग धरायला तुम्हाला वेळ मिळेल? कुणाशी भांडत बसायला किंवा अशा चिल्लर गोष्टींसाठी तुम्ही वेळ दवडाल?

.........

आम्ही सतत देवाचा विचार करता याचा अर्थ अध्यात्मिक ओढ लागलीय असा नव्हे. जर माणसं देवाचा विचार करत असतील तर याचा अर्थ ते अध्यात्मिक झाले असा नसून, ते आणखी कसं कमवायचं याचाच फक्त विचार करतील अशी शक्यता आहे. जर का त्यांच्यावर खरोखरच देव प्रसन्न झाला आणि आशीर्वाद देऊन म्हणाला, बोला काय हवंय, तर ही माणसं आणखी पैसा, संपत्ती, आरोग्य आणि काय काय मागतील. मात्र ज्यावेळी तुम्ही मृत्यूचा विचार कराल, त्याचवेळी तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतील : हे सगळं काय चाललंय, मी कुठे जाणार, माझं शेवटी काय होणार? 'जाणण्या'ची ही इच्छा नैसगिर्करीत्या निर्माण होईल.

' योग' हे फक्त जीवनाशी निगडीत नाहीयेत; ज्यावेळी आपण आरोग्यपूर्ण जीवनाची चर्चा करतो त्यावेळी आपण मृत्यूबद्दलही बोलत असतो. उत्साहाने, सहजपणे मृत्यू स्वीकारणे महत्त्वाचे आहे. या पृथ्वीतलावर करता येण्यासारखी ही शेवटची गोष्ट तुमच्या हातात असते, परंतु बहुतेक लोक यावेळी प्रचंड भयग्रस्त असतात.

ज्यावेळी आपण अध्यात्मिकतेचा विचार करतो, त्या अवकाशात मृत्यूसाठीसुद्धा जागा असते, त्याचाही विचार असतो. जगण्याला अर्थपूर्ण बनवण्याचं माध्यम म्हणजे अध्यात्मिकता आहे, आणि मृत्यू अर्थपूर्ण ठरण्यासाठीही अध्यात्मिकता महत्त्वाची आहे कारण जीवन आणि मृत्यू या भिन्न बाबी नाहीयेत. मी असं म्हणू शकतो की, या क्षणी तुम्ही जगताय किंवा असंही म्हणू शकतो की या क्षणी तुम्ही मरताय. मरण्याची प्रक्रिया सतत सुरू असते, एका दिवशी ती पूर्ण होते एवढंच. 'मृत्यू' या शब्दाभोवती खूपच नकारात्मकता चिकटलेली आहे. परंतु मरण हा आयुष्याचा एक भाग आहे. ज्याला मरण कसं स्वीकारावं हे कळत नाही किंवा मृत्यूपासून जो दूर पळतोय, त्याला जगता येणं शक्य नाही.

जर तुम्ही मृत्यूला भीत असाल तर तुम्ही केवळ जीवन अव्हेरताय, आणि तुम्ही मृत्यू तर टाळू शकत नाही. जगताना रोजच्या रोज तुम्ही जाणायला हवं की, तुम्ही र्मत्य आहात. 'शून्य' मेडिटेशनमध्ये जे जे तुम्ही माझं स्वत:चं समजत असता ते शून्य होऊन जातं; जणू काही तुम्हीच मरताहात. पुन्हा ज्यावेळी तुम्ही डोळे उघडता, त्यावेळी ते सगळं तिथंच असतं. जर जाणीवपूर्वक नीट समजून घेऊन दिवसातून दोनदा याचा अनुभव घेतलात तर ज्यावेळी मरणाची घटका जवळ येईल त्यावेळी मृत्यू ही काही फारशी मोठी बाब राहणार नाही, भयग्रस्तताच राहणार नाही.

जीवन म्हणून जे तुम्ही म्हणता ती सतत सुधारता येणारी प्रक्रिया बनणे शक्य आहे. प्रत्येकजण काही एकाच दर्जाचं, एकाच जाणिवेचं आणि तितक्याच सहजतेने जगत नाही. तुम्ही हज्जार वर्षं जरी जगलात आणि जे मिळवायचंय ते सर्व मिळवलंत तरी अजून चांगलं, अजून परिपूर्ण करणं शक्य असतंच की! हा आयुष्याचा मार्ग आहे, परंतु मृत्यू येतो त्यावेळी तो अत्यंत अचूक असतो, अंतिम असतो. त्याला कुणाच्या मदतीची, सहकार्याची गरज नसते, सुधारणेची गरज नसते. त्याबाबत विचार करायचीही तुम्हाला गरज नसते, त्याचे प्रतिबिंब त्यानंतर उमटायची शक्यता नसते कारण तो परिपूर्ण असतो. परंतु आयुष्य मर्यादित असल्याने त्याचे प्रतिबिंब सारखे पडत असते, आयुष्य परिपूर्ण किंवा अंतिम नसते.

त्यामुळे अध्यात्मिक उत्क्रांतीसाठी इच्छुक असलेल्यासाठी शिक्षणाची पहिली पायरी म्हणजे त्यानं स्मशानात जाऊन बसणं. तुम्हाला जाणवेल की तुमचं अस्तित्त्व म्हणजे एक जिवंत चमत्कार आहे, आणि एके दिवशी तेही संपणार आहे. तुम्ही एखाद्या बुडबुड्यासारखे आहात, अस्तित्त्व असताना अत्यंत खरं, जितंजागतं, परंतु एक छोटासा धक्का आणि सगळं संपून जातं!

या जीवनाकडे आत्ताच नीट बघा : श्वास घेतला जातो, सोडला जातो. जर पुढचा श्वास घेतलाच गेला नाही, तर... बघा आयुष्य किती तकलादू, किती क्षणभंगूर आहे. माणसं नेहमी मृत्यूचा दुसऱ्या कोणाला तरी येणारा असा विचार करतात; परंतु असं नाहीये, तो तुम्हालाही येणारे आणि मलाही.

ज्यावेळी जाणिवेच्या पातळीवर तुम्हाला उमजलं की, तुम्ही मरणार आहात, तर तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण शक्य तेवढा सुंदर करण्याची तुम्हाला इच्छा होईल। अस्तित्त्वाच्या क्षणभंगुरतेची, तकलादूपणाची ज्याला सतत जाणीव असते, तो एक क्षणही वाया दवडू इच्छित नाही. अशा व्यक्ती जबाबदारीने, जाणीवपूर्वक आणि जागरुकतेने जगतात.

स्पीकिंग ट्री
- सद् गुरु

( अनुवाद : योगी)

मी.... जागेपणातील, स्वपनवस्थेतील व गाढ झोपेतील!



अध्यात्माच्या परिप्रेक्षात, देव आहे की नाही या प्रश्नाला फारसं महत्त्व नसतं. अधात्माचं सगळं लक्ष्य माणसाच्या स्वयंपणाचं किंवा विवेकाचं नेमकं स्वरूप काय आहे हे शोधणं हेच आहे. माणसामध्ये असणाऱ्या 'मी'च्या किंवा अहमच्या उगमापर्यंत जाणं आहे. अध्यात्माच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं हेच आहे की, अस्तिक आणि नास्तिक असे दोन्ही प्रकारचे लोक देवाबद्दल चर्चा करताना दिसतात!

अध्यात्मात उत्तर शोधायचं असतं ते 'मी कोण आहे' या प्रश्नाचं! मी किंवा अहमचं अस्तित्व जागेपणी, स्वपनत आणि गाढझोपेतही माणसाच्या सोबत असतं. जागेपणी 'मी'पण माणसाच्या शारीर स्वरुपात असतं. आनंद, दु:ख यासारख्या माणसाच्या भौतिक संवेदनांच्या माध्यमातून भौतिक विश्वाचा अनुभव घेतं. जागेपणाच्या या स्थितीत 'मी'ची दोन रुपं दिसतात. एक; अनुभूती घेणारं माध्यम आणि दुसरं; प्रत्यक्ष अनुभूतीचा स्वीकार करणारं.

जागेपणी जसं 'मी'पण शरीरात अंतर्धान पावलेलं असतं, तसं ते स्वपनवस्थेत असतं नाही. ते एका विशिष्ट अशा तरल अवस्थेशी जोडलं गेलेलं असतं आणि स्वपनवस्थेचं आकलन ते त्याच तरल अवस्थेत करत असतं. तिथेही 'मी'पण अनुभूतीचं आकलन करण्याचं माध्यम म्हणून वावरतं. हीच भूमिका ते जागेपणीही बजावत असतं. 'मी'ची दोन रुपं स्वपनवस्थेतही पहायला मिळतात.

स्वपनतून जागं झाल्यावर माणूस सर्वसाधारण असं वक्तव्य करताना दिसतो: 'काल रात्री मला भीतीदायक स्वपन् पडलं. मी स्वत:ला मरताना पाहिलं'. आता प्रश्न निर्माण होतो की, ज्याने भीतीदायक स्वपन् पाहिलं तो 'मी' नेमका कोण? आणि जागेपणातील 'मी'ला स्वपनवस्थेतील अनुभूती कोणी सांगितली?

शरीराची धडधड सुरू असतानाही, जोपर्यंत स्वपन् सुरू असतं तोपर्यंत मनाला ते मरण खरं वाटत राहतं, ही अगदी विचित्र बाब! स्वपनतून जागं झाल्यावर मात्र, स्वपनवस्थेतला 'मी' गायब होतो आणि त्याची जागा जागेपणातील 'मी' घेतो. हाच 'मी' स्वपनतील अनुभूती सांगायला सुरुवात करतो. स्वपनवस्थेत हा 'मी' तिथे नसतानाही तो हे सांगतो. दोन्ही अवस्थेतील दोन 'मी' हे माणसाचे स्वयंपण नव्हेत. ते खरे नाहीत असाच त्याचा अर्थ.

गाढझोपेच्या अवस्थेतील 'मी' जागेपणाच्या शारीर स्वरुपाच्या अवस्थेत किंवा स्वपनवस्थेतील तरल स्थितीतही नसतो. गाढझोपेतून जागं झाल्यावर माणूस वक्तव्य करतो ते असं : 'काल रात्री मला शांत झोप लागली'. शांत झोप लागली याची अनुभूती सांगणारा हा 'मी' कोण?

याचा अर्थ तिन्ही अवस्थेत 'मी'पणाचं अस्तित्व जाणवत राहतं. याच भान असणारं आणि तीनही अवस्थेत एका साक्षीदाराची भूमिका बजावणारं असं असतं ते 'स्वयंपण' . तेच तीनही अवस्थेतील 'मी'चा आधार असतं.

तीनही अवस्थेतील 'मी'च्या पलीकडे या स्वयंपणाचं अस्तित्व असतं। इथे 'मी'पण नाहीसं होतं आणि त्याची वेगळी दिसणारी दोन रुपंही नाहीशी होतात. ही स्थिती म्हणजे अत्युच्च स्तरावरील ज्ञानाचं प्रकटीकरण, जिथे 'मी' हे अनुभूती घेण्याचं माध्यम आणि प्रत्यक्ष अनुभूती घेणारं अशी त्याची वेगवेगळी रुपं एकमेकांत विलीन पावतात. 'मी'ला आपल्या उगमपर्यंत पोहोचण्याचा मार्ग इथेच सापडतो. या प्रक्रियेत त्याचं स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व गळून पडतं. हाच स्वत:चा शोध!

- अनुप तनेजा
( लेखक 'इंडियन हिस्टॉरिकल रिव्हयू'चे संपादक आहेत.)

जीवनाचा हेतू काय?

सद्गुरु

बहुतेक लोक आयुष्याचा काठोकाठ अनुभव घेत नाहीत. परिणामी त्यांचं मन जगण्यासाठी नेहमी काही ना काही 'हेतू' शोधत असतं. जर तुम्ही जीवनाचा सखोल अनुभव घेतलात, तर तुमच्या मनात असा प्रश्नच येणार नाही. ज्यावेळी आयुष्य उत्स्फूर्तपणे जगता येतं, त्यावेळी त्याला हेतू, कारण काही काही लागत नाही.
...................

तुम्ही ज्यावेळी आनंदानं न्हाऊन निघता, खूप समाधानात असता, त्यावेळी तुम्हाला हा प्रश्न पडतो का? तर नाही पडत. पण ज्यावेळी आयुष्यात काहीच महत्त्वाचं घडत नाही, ते निराशाजनक होतं, सुनंसुनं वाटतं त्यावेळी तुम्ही विचारता, जीवनाचा हेतू काय? केवळ जिवंत असणं पुरेसं ठरत नसतं, त्यावेळी जगायला तुम्हाला काहीतरी कारण लागतं, हेतू लागतो. आत्ता या क्षणी तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही जिवंत आहात. या क्षणी सर्वात महत्त्वाची गोष्ट शेअरबाजार वर जातोय का खाली येतोय ही नाहीये; तर तुम्ही या क्षणी श्वास घेताय ही आहे. उरलेल्या सर्व गोष्टी यापुढे दुय्यम आहेत. परंतु बहुतेक लोकांना याची जाणीवच नसते. काही तरी वेगळं घडतंय वा घडत नाहीये हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं.

बहुतेक लोक आयुष्याचा काठोकाठ अनुभव घेत नाहीत. परिणामी त्यांचं मन जगण्यासाठी नेहमी काही ना काही 'हेतू' शोधत असतं. जर तुम्ही जीवनाचा सखोल अनुभव घेतलात, तर तुमच्या मनात असा प्रश्नच येणार नाही. ज्यावेळी आयुष्य उत्स्फूर्तपणे जगता येतं, त्यावेळी त्याला हेतू, कारण काही काही लागत नाही. तुम्ही ऑफिसमध्ये जाता त्यावेळी पैसे कमावणं वगैरे काही ना काही हेतू चिकटलेले असतात. परंतु तुम्ही ज्यावेळी पाटीर्ला जाता, त्यावेळी काय हेतू असतो? काही नाही. तिथे असणं हेच तुमच्यासाठी पुरेसं असतं. उत्साहानं, उत्स्फूर्तपणे प्रत्येक क्षणात जिवंत असणं जीवनासाठी पुरेसं असतं. कुठेतरी जाण्यासाठी जसं कारण लागतं, तसं कारण आयुष्याला लागतच नाही. विश्वाच्या निमिर्तीचं हेच तर सौंदर्य आहे. पंचेदियांच्या माध्यमातून आयुष्याकडे बघण्याची दृष्टी, तुमच्याकडे आत्ता या क्षणीही आहे. जगण्यासाठी आवश्यक बाब म्हणून वेगवेगळ्या प्राणिमात्रांची इंदिये विविध प्रकारे विविध माहिती ग्रहण करत असतात. काही काळानंतर तुम्हाला धक्का बसतो की, या आयुष्याचा हेतू काय आहे? असं होतं; कारण तुम्ही कुठलीही गोष्ट पूर्णपणे बघतच नाही. कारण इंदियांच्या ग्रहणक्षमतेची ती मर्यादा असते. जर मी तुम्हाला माझ्या हाताचा एक भाग दाखवला तर तुम्हाला त्याची दुसरी बाजू दिसत नाही. हे सर्व बाबींना लागू आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट तुकड्या तुकड्यांनी बघता. अगदी तुम्ही वाळूचा इवलासा कण जरी बघितलात तरी, तुम्ही त्याची एक बाजूच बघू शकाल. तुमच्या डोक्यात या क्षणी असलेली सर्व माहिती पाच इंदियांच्या सहाय्याने तुकड्या तुकड्याने ग्रहण करण्यात आलेली आहे. वाळूचा एक कणही संपूर्णपणे बघणं त्याला शक्य नाहीये. प्रत्येक गोष्ट मेंदूला तुकड्या-तुकड्यानं कळते. तुम्ही आणखी एखादा तुकडा जोडलात तरी संपूर्ण चित्र तुमच्यापुढे स्पष्ट होणार नाही. पंचेंदियांच्या सहाय्याने कितीही तुकडे तुम्ही गोळा करा, तरी ते चित्र संपूर्ण नाही होऊ शकत.

त्यामुळे 'शिव' नेहमी आपल्यासमोर सादर होताना 'त्रिनेत्र' स्वरूपात येतो. ज्यावेळी आपण तिसरा डोळा उघडला असं म्हणतो, त्यावेळी कपाळावर शस्त्रक्रिया करून मागचा भाग पुढे आणणं आपल्याला अभिप्रेत नसतं. तर आपल्या डोळ्यांनी जे आपण बघू शकतो, त्याच्या पलीकडचं बघणं अभिप्रेत असतं. दृष्टी या इंदियाची मर्यादा ही आहे, की जर मी माझ्या हातानी डोळे झाकून घेतले तर पलीकडचं काहीही मला दिसत नाही. आणि आपल्या इंदियांच्या सार्मथ्याला अटकाव करणारं, त्यांच्या मर्यादा दाखवणारं या भौतिक जगात नेहमीच काही ना काही असतं. त्यामुळं ज्यावेळी तिसरा डोळा असं आपण म्हणतो, त्यावेळी आयुष्य सर्व अंगांनी, संपूर्णपणे जाणून घेणं असं आपल्याला म्हणायचं असतं.

आयुष्य अशा रीतीने बनवण्यात आलंय की, त्याला कुठल्याही हेतूची आवश्यकता नाहीये. परंतु लोकांना आयुष्य सर्वार्थानं जगण्यासाठी उद्युक्त करताना, आपण असं म्हणावं की, जीवनाचा हेतू ते सखोलपणे सर्वांगानं जाणून घेणं हा आहे. अन्यथा जीवनाला काहीच हेतू लागत नाही, हे तुम्हाला लक्षातच येणार नाही. हेतूची काहीच गरज नाही हे एकदा तुमच्या लक्षात आलं की, आपण जिवंत आहोत ही जाणीवच खूप भन्नाट वाटते.

( अनुवाद : योगी)

प्रार्थना

डॉ. प्र. चिं. शेजवलकर हे वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेतील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आहेत. गेली ५० वषेर् ते अध्यात्मावरही विविध अंगांनी लेखन करत आहेत.

........

मला माझ्या एका विद्यार्थ्याने, मी देवळात जातो का, असे विचारले. मी 'हो' असे म्हणालो. देवळात का जाता, असे विचारल्यावर, मी प्रार्थना करण्यासाठी जातो, असे त्याला म्हणालो. 'या वयात देवळातल्या देवासमोर प्रार्थना करून अजून तुम्हाला आता काय मागायचे आहे?' असे त्याने कुतूहल वाटून विचारले. तेव्हा मी त्याला म्हणालो, 'देवाजवळ काही मागून मिळत असते असे नाही. मला सद्बुद्धी दे आणि मला माझ्या विद्यार्थ्यांची अजूनही सेवा करता येऊ दे', अशी प्रार्थना मी करतो. हा संवाद मला आठवण्याचे कारण हेच की, प्रार्थना नेमकी कशासाठी करावयाची, याचा आपण विचार करतो की नाही, याची मला शंका आहे.

जगभर सगळेच लोक प्रार्थना करतात. सर्व धर्मांमध्ये निरनिराळ्या नावाने प्रार्थना कराव्यात, असे सांगितले आहे. मला देवळात जाण्यास वेळ मिळत नसल्याने जी काही छोटी प्रार्थना मी करतो ती घरीच करतो. अतिशय कामात व्यग्र असलेली माणसे प्रवासातही ती करतात. प्रार्थना करणाऱ्या या सर्वांबद्दल मला कुतूहल आणि आदर वाटतो. परंतु प्रार्थना कशासाठी केली जाते, याचा विचार केल्यावर मात्र अनेक जण एक कर्मकांड म्हणून प्रार्थना करतात, हे कळून आल्यावर विषाद वाटतो. मनापासून केलेली प्रार्थना ही पवित्र असते आणि आपले मन शुद्ध आणि स्वच्छ करू शकते. पण बहुसंख्य लोक प्रार्थना भीतीपोटी करतात किंवा वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी करतात. प्रत्येकाच्या वाट्याला अनेक दु:खे येत असतात. मनात काळज्या असतात. यातून निर्माण होणारी भीती नाहीशी व्हावी म्हणून प्रार्थनेच्या माध्यमातून असे लोक देवाचा धावा करतात. त्यांना मी दोष देत नाही. हा मानवी स्वभाव आहे. पण काही लोक अतिमहत्त्वाकांक्षी असतात. आपली कुवता आणि गुणवत्ता यापेक्षा त्यांना अधिक काही तरी मिळावे, अशा अपेक्षा असतात. त्यामुळे हतबल होऊन देवाची प्रार्थना केल्यावाचून गत्यंतरच नसते. याचनेसाठी प्रार्थना करणाऱ्यांना मी दोष देत नाही. या सुखदु:खाच्या पलीकडे जाऊन परमेश्वरा-जवळ जाण्याची खरी ओढ निर्माण होते, तेव्हा केलेली प्रार्थना आत्मोन्नती करणारी असते.

आपल्याला गरज भासते म्हणून जेव्हा आपण प्रार्थना करतो, तेव्हा ते आपल्यातल्या दुबळेपणाचे लक्षण असते. जे आपल्यापाशी नाही, ते मिळण्याकरता केलेली प्रार्थना आपली अकार्यक्षमताच सिद्ध करते. इच्छा, आकांक्षा आणि वासना सोडून प्रार्थना करण्यासाठी फार मोठे मनोबल असावे लागते. प्रत्येक धर्मग्रंथात प्रार्थनेचे महत्त्व विशद केलेले आहे. पण त्याचबरोबर परमेश्वराने आपल्या अंत:करणात निवास करावा आणि आपल्याला सद्वर्तनासाठी मार्गदर्शन करावे यासाठी ती प्रार्थना असते, असेही धर्मगुरूंनी म्हटले आहे.

मन शांत, प्रसन्न आणि उल्हसित करण्याचे सार्मथ्य प्रार्थनेत असते. त्यात अंधश्रद्धेचा कोणताही भाग नसतो. काळजातला अंध:कार आणि चिंता प्रार्थनेने नाहीशा होतात. मनापासून केलेल्या प्रार्थनेमुळे आपण निराकार, निर्गुण अशा परमेश्वराच्या सन्निध गेल्याचा आपल्याला साक्षात्कार होऊ शकतो. सामान्य माणूस जगण्याची धडपड करताना किती तरी वेळा आर्त आणि बुभुक्षित असतो. त्याला अर्थाथीर् व्हावे लागते. पण पैसा हाच परमेश्वर नाही, याचा त्याला जेव्हा प्रत्यय येऊ लागतो, तेव्हा तो साधक होतो. गुरूचे मार्गदर्शन घेऊन आणि गुरूच्या अनुग्रहाचा त्याच्यावर वर्षाव झाल्यावर तो जी साधना आणि तपश्चर्या करतो, त्यातून निर्माण झालेली प्रार्थना अकल्पित आणि अनपेक्षित अशी मन:शांती निर्माण करते. अशा वेळी सभोवतालचे जग आणि आजूबाजूचा निसर्ग सुंदर वाटू लागतो. परमेश्वराचे अस्तित्व जाणवू लागते. मनात आणि शरीरातही नवी चेतना निर्माण झाल्याचा अनुभव येतो. आपले स्वत:चे अस्तित्व आपण विसरतो. राग, द्वेष, असूया, अहंकार, वासना गळून पडतात. आपण स्वत:च्या उद्धारासाठी प्रार्थना करतो. जगातल्या अनेक विभूतींनी संपूर्ण मानवतेसाठी प्रार्थना केल्या आहेत आणि त्यांच्या प्रार्थनेमुळे भरकटलेल्या समाजात स्थैर्य आणि शांतता आली आहे. गौतम बुद्धाने मानवतेसाठी केलेल्या प्रार्थनेमुळे नरसंहार थांबला. अराजक नाहीसे झाले. स्वामी विवेकानंदांनी केलेल्या प्रार्थनेच्या संदेशात या पृथ्वीवरील संपूर्ण मानवजात एकच आहे आणि ती एक राहावी, ही हाक होती. महात्मा गांधींच्या प्रार्थनेत अहिंसेचा मूलमंत्र होता. अवनीतलावर विसाव्या शतकात महात्मा गांधी नावाचा मानवतेचा एक पुजारी संपूर्ण जगात प्रेम, समता, शांतता आणि बंधुता नांदावी यासाठी वणवण करीत होता, हे आणखी पाचशे वर्षांनी कदाचित कोणालाही खरे वाटणार नाही, असे आईन्स्टाईनने उद्गार काढले आहेत. दीनदुबळ्यांचे आणि व्याधींनी त्रस्त झालेल्यांचे अश्रू पुसणाऱ्या मदर तेरेसांची प्रार्थना किती तरी उदात्त होती. आपल्या प्रार्थनेतून मानवसमूहाला प्रकाश देणारे योगी अरविंद अजूनही आम्हा सर्वांना दीपस्तंभासारखे वाटतात. मात्र प्रार्थनेतील शब्द, स्वर, स्वरूप कसेही असले, तरी त्यामध्ये एकाग्रता हवी. तरच ती खरी प्रार्थना म्हणता येईल.

- डॉ. प्र. चिं. शेजवलकर

अमर्याद भरवसा

पृथ्वीतलावर एकही माणूस नाही की ज्याला चिंता नाही. बरे तर आपल्या चिंताही 'स्व'शी जोडल्या गेलेल्या आहेत. विद्यार्थ्याला अभ्यासाची, स्नातकाला धंदा-नोकरीची, नोकरीवाल्याला लग्नाची, लग्न झालेल्या दांपत्यांना अपत्यांची, त्यांच्याही शिक्षणाची इत्यादी असंख्य चिंता आहेत. त्यातून सुटका नाही. अशा वेळी काय करावे? आवश्यक ती कर्तव्ये तर करावीतच, त्याचबरोबर भगवंतावर विश्वास ठेवावा. सर्वार्थाने त्याला शरण जावे. त्याने स्पष्ट सांगितले आहे, ''तू माझा हात पकडलेला आहेस ना? आता माझ्यावर विश्वास ठेव, चिंता सोडून दे.'' अशा प्रकारे तो भक्ताला आश्वस्त करतो. संत श्री तुकारामही म्हणतात, ''हेचि माझे तप। हेचि माझे दान। हेचि अनुष्ठान नाम तुझे। हेचि माझे तीर्थ, हेचि माझे व्रत। सत्य हे सुकृत नाम तुझे। हेचि माझे कर्म हेचि माझा धर्म। हाचि नित्यनेम नाम तुझे। तुका म्हणे दुजे सांगायासी नाही नामेविण काही धनवित्त। आपण आपला भाव, भक्ती, श्ाद्धा आणि प्रीती भगवंतावरच सोडायला हवी. श्ाद्धेविषयी गीतेसहित इतर धर्मांमध्येही विपुल मार्गदर्शन केलेले आहे. त्यादृष्टीने हा दृष्टांत समर्पक आहे.

गुरजिएफ एक छोटासा प्रयोग करत होता. दूर एका शांत एकांत ठिकाणी त्याने आपल्या काही शिष्यांना एकत्र बोलावले आणि सांगितले की, जेव्हा मी म्हणेन थांबा, तेव्हा तुम्ही जसे असाल तसे थांबा. समजा चालण्यासाठी एक पाऊल उचलले असेल तरी ते तसेच उचललेले राहू द्या. ते पाऊल खाली ठेवू नका.

जवळच एक कालवा होता आणि सकाळी तीन तरुण तो पार करत होते आणि गुरजिएफ आपल्या तंबूमध्ये बसला होता. आतमधून तो ओरडला, थांबा, तेव्हा ते तीनही तरुण त्या कालव्यामध्ये थांबून गेले. कालवा तेव्हा कोरडा होता, तेथे पाणी वाहत नव्हते. परंतु कुणी तरी कालव्यात पाणी सोडले. पाणी सोडणाऱ्याला काय माहिती की तीन युवक मूतीर्सारखे कालव्यामध्ये उभे असतील. गुरजिएफ तर तंबूमध्ये बसले आहेत. त्यांना माहितीही नाही की कालव्यामध्ये पाणी कुणी सोडले. परंतु त्यांनी थोडा वेळ प्रतीक्षा केली. बुद्धी सुद्धा थोडा वेळ प्रतीक्षा करते. संकट अजून किती लांब आहे तोपर्यंत ती वाट बघते. मग पाणी गळ्यापर्यंत वाढू लागले. जेव्हा पाणी तोंडापर्यंत आले, तेव्हा एकाने उडी मारली व बाहेर आला. तो म्हणाला की प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात, भरवशाचीही एक मर्यादा असते. परंतु लक्षात घ्या, भरवशाला कोणतीही सीमा नसते. मर्यादा असणारा भरवसा हा भरवसा नसतोच मुळी! ती फसवणूक असते. ती बुद्धीचीच युक्ती असते. भरवसा तर असीम (अमर्यादित) असतो.

एक उडी मारून बाहेर गेला. दुसऱ्याने अजून थोडा वेळ वाट बघितली. काय सांगावे कदाचित गुरजिएफ म्हणतील की आता पुरे झाले, प्रयोगाच्या बाहेर या. आता ओठही बुडायला लागले होते, परंतु जीवाला कोणताही धोका नव्हता. नाकाला पाणी स्पर्श करू लागले. तेव्हा धोका सुरू झाला. एक उडी मारून तोसुद्धा बाहेर आला. तो म्हणाला की आता थांबणे हे मूर्खपणाचे आहे आणि गुरूला यातील काहीही माहीत नव्हते आणि असे काहीही माहिती नसताना आत्महत्या करण्यात काही अर्थ नाही. परंतु तिसरा तसाच उभा होता. पाणी आले, नाक बुडले, प्राण तडफडू लागले, तरीही तो उभा राहिला. पाण्याचा प्रवाह आला आणि डोकेही बुडून गेले आणि त्याचक्षणी एखाद्या तुफानासारखे गुरजिएफ धावत आले आणि त्यांनी त्या तरुणाला बाहेर काढले. तो बेशुद्ध झाला होता. मोठ्या मुश्किलीने त्याला शुद्धीवर आणू शकले. परंतु त्या दिवशी त्याला (पैलतीर) किनारा मिळाला. डोळे उघडून त्याने गुरूचे पाय पकडले आणि तो म्हणाला, जे जाणून घ्यायचे होते ते मी जाणले, जे मिळवायचे होते ते मी मिळवले.

गुरजिएफ याला स्फटिकाप्रमाणे जगणे म्हणतात. अशा घटकेला तुम्ही सारे काही पणाला लावता आणि काहीच उरत नाही. एक उडी फक्त मारली जाते. परिघावरून तुम्ही मध्यभागी (केंदस्थानी) पोहोचता. जेव्हा तुम्ही सारे काही पणाला लावता आणि प्रवाहाच्या मध्यभागी बुडायला तयार होता, त्याच वेळेला तुम्हाला किनारा मिळालेला असतो. तेव्हाच पहिल्यांदा तुमचा आत्मा एक होतो, पर्वताप्रमाणे बनतो. तुम्हाला आता कोणीही हलवू शकणार नाही. त्या दिवशी कालव्यामध्ये दोघेजण चुकले; कारण त्यांनी आधार घेतला. बुद्धीने सुचवलेल्या नावेमध्ये ते सवार झाले. एकाने मिळवले, कारण त्याने कोणताही आधार घेतला नाही. तो एकदम आधारहीन झाला, मरायलाही तयार झाला. त्याच्यासाठी गुरू धावला. कदाचित गुरू एखाद्या वेळेस चुकेल, पण परमेश्वर कधी चुकणार नाही. जेव्हा तुम्ही सारे काही पणाला लावून टाकता, तेव्हा सारे अस्तित्व तुम्हाला वाचवण्यासाठी तयार होऊन जाते.

म्हणून कबीर म्हणतात की, ज्याने अविश्वास ठेवला तो बुडाला व ज्याने पूर्ण-पूर्ण विश्वास ठेवला तो पैलतीरी लागला.

- वेणूगोपाल धूत

आनंदाचे बीज पेरावे

विचारांनी मोठी असलेली अनेक माणसं असतात पण आचरणानेही मोठी असलेली माणसे तुलनेने कमीच. आपला विचार सर्वप्रथम आपल्याच अंगी बाणवून तो आयुष्यभर आचरत राहण्याइतकं अवघड जगात दुसरं काही नाही. ज्ञानेश्वर महाराजांचे उदाहरण मला याबाबतीत आदर्श वाटते.

शांत, प्रेमळ स्वभावाच्या ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना तत्कालीन समाजाने कितीतरी छळले... त्यांच्या आई-वडिलांना मानसिक त्रास दिला. त्यांच्या कुटुंबाला निंदेचे आणि टीकेचे लक्ष्य बनवले. अशा समाजाला ज्ञानेश्वर महाराजांनी काय दिले? तर प्रेमाची आणि मायेची मुग्ध उधळण आणि भागवत धर्माची सहिष्णू शिकवण. सर्वांचे अपराध पोटात घालून सर्वांवर आईची माया करणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांना 'ज्ञानेश्वर माऊली' असे म्हटले जाते. वाईट गोष्टी लक्षात न ठेवता केवळ चांगल्या गोष्टी मनात ठेवून वागले की आयुष्याला, विचारांना नेमकी दिशा मिळते आणि हातून उत्तमोत्तम काम होत राहते.

बाबरी मशिदीनंतर घडलेले भयानक मृत्यूचे तांडव किंवा गोध्रानंतरचे हत्याकांड पाहिले की मन सुन्न होते. लोक केवळ सूडभावनेनेच का पेटतात? लोक क्षमाशील का होत नाहीत? आणि अशा जखमांच्या खपल्या दरवषीर् या घटनांचा स्मृतिदिन म्हणून का नव्याने काढल्या जातात? हेच समजत नाही. दु:खद, क्लेशदायक प्रसंगांनी मन भरून ठेवण्यापेक्षा ते आनंदाच्या आठवणींनी समृद्ध करावे.

रानातल्या झऱ्याचे उदाहरण याबाबतीत मला आदर्श वाटते. रानातला झरा म्हणजे मुक्ततेचे प्रतिक. अडथळ्यांची पर्वा न करता तो प्रवाही राहतो. वाटेत काटेरी झाडे-झुडपे, छोटे-मोठे खाचखळगे यातून तो आनंदाने झुळुझुळु वाहत राहतो. वाटेत भलामोठा धोंडा आला तर त्यामुळे अडून न जाता, त्याच्या बाजूने वाट काढत आपला प्रवास आनंदाने सुरू ठेवतो. धोंड्याशी जर झरा थांबू लागला तर तो आपले अस्तित्वच गमावून बसेल आणि पाण्याचे निव्वळ डबके त्या धोंड्यापाशी तयार होईल. माणसानेही दु:खद आठवणींपाशी थांबून डबक्यासारखे न होता, आनंद मनात साठवून प्रवाही व्हावे.

अरे, आयुष्याच्या वहीतले कालचे पान तर उलटून गेले आहे, उद्याचे पान असेल की नाही ते माहिती नाही. आहे ते फक्त आजचे कोरे पान! मग त्या पानावर जे सुंदर आहे तेच लिहू द्या ना. आणि आयुष्याच्या वहीवर चालेल असे खोडरबर कोठेच मिळत नाही. हे न विसरता सुंदर क्षणांच्या नोंदी करून जगणे सर्वात सोपे जाते.

अगदी लहानपणापासून वयाच्या आठव्या वर्षापासून व्यवसायाशी संबंध आला. छोट्या-छोट्या गोष्टी विकायचो. रस्त्यावर बसून व्यवसाय करायचो. त्यामुळे असंख्य लोकांचे जवळून निरीक्षण करता आले. वेगवेगळे अनुभव आले. पुढे रंग, फनिर्चर, इलेक्ट्रिक, प्लंबिंग अशा विविध गोष्टींची कंत्राटदारी करताना आणि मग बिल्डर झाल्यावरही समाजातल्या भल्या-बुऱ्या लोकांशी संबंध आला. या वाटचालीत अनेक कटू आठवणी, अपमान झोळीत पडले. पण कायम चांगल्या गोष्टी, सुंदर अनुभवच लक्षात राहिले आणि प्रवास सुरूच राहिला.

खरे सांगतो... मला तल्लख स्मरणशक्ती नाही म्हणून मी कायम देवाचे आभार मानत असतो. आणि त्यातही मला देवाने झुकते माप दिले आहे. तो वाईटाची स्मरणशक्ती घालवतो आणि आनंदाची ठेवतो. त्यामुळेच आयुष्याचा ताळेबंद मांडल्यावर वाईटापेक्षा चांगल्याची शिल्लक फार मोठी राहते.

' जसं पेराल तसंच उगवतं.' हा साधा नियम आहे. आंब्याची कोय पेरलीत तर आंब्याचे झाड येते, निवडुंग पेरलात तर निवडुंगच येतो. आयुष्यातही असेच असते. म्हणून आनंदाचे बीज पेरावे म्हणजे आनंदाचा वटवृक्ष तयार होतो. त्याच्या सावलीत समाधानाचा मिळणारा गारवा हा आध्यात्मिक अनुभवाइतकाच शांत, निरामय ठरतो.

- डी. एस. कुलकर्णी